जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांचे मार्फत Government E-Marketplace म्हणजे GeM Portal वर खरेदीचा वापर वाढण्यासाठी सखोल मार्गदर्शन


 जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शासकीय कार्यालया मार्फत होणारी वस्तु व सेवा खरेदीसाठीच्या कार्यपद्धती प्रक्रीया पार पाडण्याच्या दृष्टिने जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांचे मार्फत Government E-Marketplace म्हणजे GeM Portal वर खरेदीचा वापर वाढण्यासाठी जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना उद्योग संचालनालया मार्फत तज्ञ अधिकारी श्री. निखील पाटील यांनी दि. १२/१०/२०२३ रोजी अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी, कार्यालय आवार, जळगाव येथे अतिशय सोप्या पद्धतीने सदर पोर्टल कसे वापरावे याचा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]

   तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सर्व विभागांमार्फत आवश्यक खरेदी प्रक्रीया ही GeM Portal वर करण्यात येऊन जास्तीत जास्त सदर प्रणालीचा वापर करावा. असे प्रस्तावना मा. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे. व या कार्यक्रमाचे सुत्र संचालन हे जिल्हा उद्योग केंद्रांचे उद्योग निरीक्षक श्री. अनिल गाढे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय आणि स्वायत्त संस्थांतील अधिकारी / कर्मचारी यांनी लाभ घेतला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️