तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....



मित्रहो आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा e nakasha मिळवण्यासाठी तहसील कार्यालय येथे जावे लागते. तहसिल कार्यालय मध्ये आपल्याला भूमी अभिलेख विभागामध्ये अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला बऱ्याच दिवसांनी आपल्या जमीनचा सातबाऱ्याचा नकाशा दिला जातो.[ads id="ads1"]

जमिनीचा नकाशा आपल्याला जर घरबसल्या पाहायचा किंवा डाउनलोड करायचा असेल ऑनलाईन सुद्धा आपण जमिनीचा नकाशा डाउनलोड करू शकता. तो कसा पाहावा खालीलप्रमाणे माहिती देण्यात आलेली त्याप्रमाणे आपण पाहायचा आहे.

आपल्या सातबाराच्या शेजारी कोणते गट नंबर आहेत आणि ते आपल्या नकाश्यामध्ये पाहता येऊ शकते. हो आपण घरबसल्या नकाशा डाउनलोड करून ते पाहू शकतो. चला तर आपण खालीलप्रमाणे जमिनीचा नकाशा (e Naksha ) डाउनलोड कसा करायचा हे पाहूया.[ads id="ads2"]

जमिनीचा नकाशा डाउनलोड असा करा.

  • सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

येथे क्लिक करा

  • या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम राज्य निवडावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला category मधून शहरी कि ग्रामीण ते निवडायचे
  • त्यानंतर आपण आपला जिल्हा,तालुका आणि शेवटी गाव निवडायचे आहे.
  • त्यानंतर मॅप टाईप मधून village map सिलेक्ट करायचे आहे.
  • शेवटी Search By Plot No मध्ये आपल्याला आपल्या सातबाऱ्याचा नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर search करा
  • नकाशा असा करा डाउनलोड

आता तुम्हाला तुमचा नकाशा ओपन होईल या नकाशाच्या चारी बाजू दिसून येतील. त्याचबरोबर आपणास शेजारील गट नंबर पाहायला भेटतील आणि या नकाशामध्ये आपले किती क्षेत्र आहे. उतारा कोणाच्या नावे आहे हे पाहायला भेटेल.

ओपन झालेला नकाशा आपण डाउनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे Map Report वर क्लिक करायची आहे.

त्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल यातून आपल्याला ओपन झालेली pdf फाईल पाहता येणार आहे. ही फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्रिंट वर क्लिक करावी लागेल. त्यानंतर आपण pdf फाईल सेव्ह करायची आहे.


अश्या प्रकारे आता आपल्याला आपल्या सातबाऱ्याचा नकाशा ओपन होईल. ह्या नकाशामध्ये आपण पाहू शकता कि आपला जो सातबारा आहे. त्याला कलर देण्यात आलेला आहे , आणि चारी बाजूला गट नंबर देण्यात आलेले आहेत. हे गट नंबर आपण पाहू शकता.

7/12 फ्री मध्ये कसा पाहावा खालील प्रमाणे माहिती देण्यात आलेली त्यावर क्लीक करून अधिकची माहिती घेऊ शकता.  7/12 app Saatbara uatara 

 7/12 uatara मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️