बौद्ध तरुणांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी

बौद्ध तरुणांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :--  नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील दौलत निकम ह्या मूळ मजुरी करणाऱ्या तरुणास तू माझे दुकान सोडून दुसऱ्याकडे का कामाला गेलास? साल्या महारड्या शेवटी तू जातीवरच गेलास असे म्हणून अशोक बाळासाहेब बोरसे या जातीवादी गाव गुंडांनी मारहाण केली. असून मारहाण करणाऱ्या जातीयवादी बोरसे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाई तर्फे देण्यात आला आहे.[ads id="ads1"]

       याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील अमोल दौलत निकम या मोर मजुरी करणाऱ्या तरुणास तू माझे दुकान सोडून दुसऱ्याकडे का कामाला गेलास? साल्या महारड्या शेवटी तो जातीवरच गेलास असे म्हणून अशोक बाळासाहेब बोरसे या जातीयवादी गाव गुंडांनी मारहाण केली. त्यावेळी त्याचा मुलगा अनिकेत अशोक बोरसे यांनी लोखंडी का जाणून दिला तेव्हा त्या गजाने अमोल रक्कम या बौद्ध तरुणाच्या डोक्यात वार करून तो मेला असे समजून काही लोक मदतीला धावले. [ads id="ads2"]

  मदतीला धावलेल्या लोकांना एक महार मारलाय तुम्हालाही मरायचं का? तुम्हाला दाखवतो पाटलाचा हिसका असे म्हणून निघून गेला. त्यावेळी काही बौद्ध तरुणांनी त्याच्या नातेवाईकांना फोन केला तेव्हा ते मळ्यातून आल्यावर त्यांनी त्यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले‌ त्यानंतर सदर तरुणास बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मालेगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. नांदगाव पोलिसांनी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे इतका गंभीर प्रकार घडला असून देखील पोलीस काहीच कारवाई करत नसल्याने ते आरोपींना पाठीशी घालत तर नाही ना अशी सामान्य नागरिकांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. त्यावेळी रिपाई नेते कैलासभाई पगारे यांनी नांदगाव भेट देऊन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना संबंधित जातीवादी गावगुंड अशोक बोरसे यांच्यावर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 चे कलम 3(१) 1, कलम (१)5 तसेच भादवि कलम 307, 326, 305, 306 अंतर्गत त्वरित कारवाई करून त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी केली असून कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

      यावेळी रिपाई नेत्या जयश्रीताई वाघ, सचिन वाघ, मालेगाव युवा शहराध्यक्ष सुनील भाऊ उशिरे, बीपीध निकम,, दत्तू निकम, भाऊसाहेब निकम इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️