साकळी येथिल अंजुमने ए इस्लाम उर्दु कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

 


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील दोनगाव येथे इंग्लिश मेडीयम शाळेत तालुका मैदानी १९वर्ष गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात साकळी येथिल अंजुमने ए इस्लाम उर्दु कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.[ads id="ads1"]

साकळी या गावातील साकळी येथिल अंजुमने ए इस्लाम उर्दु कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत सहभाग घेत लांब उडी यात आकिब शेख आबीद या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकविला तर शेख तंवक्कल फिरोज याने दुसरा क्रमांक पटकविला तीहेरी उडी मध्ये शेख तंवक्कल फिरोज याने पहिला, शेख नोमान असलम याने दुसरा क्रमांक हातोडा फेक मध्ये तडवी असीम जावेद याने दुसरा क्रमांक पटकविला.११० m हर्डल मध्ये नोमान शेख असलम याने दुसरा क्रमांक मिळवले.[ads id="ads2"]

४०० मिटर हर्डल  मध्ये आकिब शेख आबिद याने पहिला तर दुसरा क्रमांक उमर खान आरिफ खान याने यश मिळवले त्याच प्रमाणे ४*१००m रीले  मध्ये नोमान शेख असलम, आकिब शेख आबिद, शेख तंवक्कल फिरोज, जाकीर खालिक अदनान बशीर,४*४०० m रिले मध्ये हुजेफ ताहेर खान, उमर आरिफ खान, अयान साबीर खान, रेहान कलीम शेख आदींनी यश संपादन करून संस्थेचे नाव लवकिक केल्याने अंजुमन ए इस्लाम उर्दु शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संस्थेचे सदस्य मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी अशफाक सर व  फैसल खान लतीफ खान यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले त्यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️