जलजीवन मिशन अंतर्गत मेहकर तालुक्यातील ९८ ग्रा.पं. च्या ग्रामस्तरीय भागधारकांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न


बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा)

भारत सरकारच्या पेयजल मंत्रालय अंतर्गत देशातील ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरडोई दररोज किमान 55 लिटर शुद्ध व पुरेसे पाणी दिर्घकाळ उपलब्ध करून देणारा जलजीवन मिशन हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.[ads id="ads1"]

सदर प्रकल्प कालावधीत पूर्ण करून आपले गाव हर घर जल करण्यासाठी  जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा व स्वछता विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलढाणा, पंचायत समिति मेहकर, यांच्या वतीने मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायत च्या  भागधारकांसाठी हॉटेल के व्ही प्राइड व हॉटेल साद मेहकर येथे दिनांक 4सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत ८ बैच मध्ये आयोजित  दोन दिवशीय क्षमता बांधनी कार्यक्रम संपन्न झाला.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम मा. श्रीमती भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. शंकर भारसाखळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या नियंत्रणात संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे.[ads id="ads2"]

प्रशिक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी मा. मनीषा शेजव, मनुष्यबळ विकास अधिकारी जल जीवन मिशन जिल्हा परिषद बुलढाणा यांचे पर्यवेक्षन सुरू आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन गट विकास अधिकारी पांढरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी शिवाजी गवई, विस्तार अधिकारी पंडागळे, अभियंता गिरी यांनी केले.   

प्रशिक्षण व्यवस्थापक अम्बादास खड्सन प्राशिक्षण समन्वयक गजेंद्र गवई यांचे मार्गदर्शनाखाली मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीच्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिति च्या पदाधिकारी ज्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, अंगनवाड़ी सेविका,आशा सेविका, जलरक्षक, बचतगट प्रतिनिधी, यांचे साठी दिनांक ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर  2023 या कालावधीत  मेहकर येथील होटल के. व्ही. प्राइड व होटल साद येथील 4 सभागृहात 8 बैच मध्ये दोन दिवशीय  कालावधीचे  गावातील  लोकांना ग्रामस्तरिय  क्षमता बांधनी प्रशिक्षण देण्यात आले.

सदर दोन दिवशीय प्रशिक्षणात जलजीवन मिशन योजना, उद्देश्य, ध्येय, गावकृति आराखडा,पाणी स्त्रोतांचे बळकटिकरण, लोकवाटा, लोकसहभाग, श्रमदान, समिति पदाधिकारी भूमिका जबाबदारी, बांधकाम पर्यवेक्षण,याजनेचे टप्पे नियोजन,अंमलबजावणी, देखभाल दुरुस्ती, पाणी नमूने तपासणी इत्यादि विषयावर सत्रनिहाय मास्टर ट्रेनर गजेंद्र गवई, यांचे सह प्रशिक्षक मछिन्द्र हिवराले, रेश्मा खडसान,छगन खरात, प्रदीप जाधव,राष्ट्रपाल दामोधर,प्रवीण उबाले,गायत्री नवाड़े, दर्शना वसावे, अर्चना वनपात्रे,प्रवीण इंगले, विनोद घानमोड़े ,गौतम अवसरमोल,यांनी विविध सांघिक खेल, गितांचे अंतर्भाव करून प्रशिक्षण दिले..समारोपिय कार्यक्रमात सर्व उपस्थित सहभागी प्रशिक्षणार्थी ना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य संसाधन संस्था  ( KRC)  चे कार्यक्रम समन्वयक सुदर्शन पवार , प्रकल्प व्यवस्थापक अम्बादास खड्सन यांचे सह पंचायत समिति मेहकर श्री दत्ता मगर, श्री.गवळी (BRC व CRC) तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांनी विशेष सहकार्य लाभाले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️