रावेर : शेतजमीन मोजणीवरून कोर्टात दावा दाखल असलेल्या जागेत वखरणी का करतोस ? असा जाब विचारल्याचा राग आल्याने एकावर विळ्याने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील पुनखेडा (Punkheda Taluka Raver) येथे घडली आहे. दगड, विटा व विळ्याने केलेल्या हाणामारीमध्ये रावेर तालुक्यातील पुनखेडा (Punkheda Taluka Raver) येथील सुभाष रामभाऊ पाटील व अमोल श्रीराम धनगर असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. दोघांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील पुनखेडा (Punkheda Taluka Raver) येथील सुभाष रामभाऊ पाटील व श्रीराम दलपत धनगर यांच्यामध्ये शेत जमिनीच्या मोजणीवरून कोर्टात दावा दाखल आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास श्रीराम धनगर हे सदर जागेमध्ये वखरणी करीत असल्याने सुभाष पाटील यांनी याबाबत धनगर यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने श्रीराम धनगर यांचा मुलगा अमोलने हातातील विळा सुभाष पाटील यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. [ads id="ads2"]
तसेच मनोज पाटील यास श्रीराम धनगरने दगड पाठीवर मारून दुखापत केली अशी मनोज पाटील यांनी रावेर पोलिसात (Raver Police Station) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर याच घटनेत वखरणी करणाऱ्या श्रीराम धनगर यांना सुभाष पाटील यांनी दगड मारून दुखापत केली असून मनोज पाटीलने विळा मारून डोके फोडून दुखापत केल्याची फिर्याद रावेर पोलिस स्टेशनमध्ये(Raver Police Station) अमोल धनगर यांनी दिली आहे.
याघटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात (Jalgaon Civil Hospital) पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे (Raver Police Station PI) पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस कर्मचारी अर्जुन सोनवणे हे करीत आहेत.