या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आता त्यांनी त्यांच्या दौऱ्या दरम्यान तसेच महत्वाच्या बैठकीत असताना जन सामान्यांचे अर्ज व निवेदनाचे काम अडून राहू नये त्यांना विना अडथळा अर्ज व निवेदन करता यावेत याकरिता आपला व्हाट्सअप नंबर खुला केला असून त्यांनी आपल्या विविध सोशल मीडिया अकाउंट वरून जन सामान्यांसाठी आपला व्हाट्सअप नंबर शेअर केला आहे. [ads id="ads2"]
या कामगिरी बद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाची थाप पडत आहे.जन सामान्यांसाठी एवढ्या तळमळीने काम करणारा असा अधिकारी आम्ही आत्तापर्यंत तरी पहिला नाही.अशा जनमाणसातून प्रतिक्रिया येत आहेत.
आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व समाजभिमुख, कार्यतत्पर अधिकाऱ्याची महाराष्ट्र राज्याला व देशाला खूप गरज आहे.-तर नरेंद्र देसले म्हणतात साहेब सलाम आहे आपल्या कार्याला आपली प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातील अधिकारी यांनी बोध घ्यावा.अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया जनसामान्यांतून येत आहेत.