महाराष्ट्रातील असा एक अधिकारी ज्यांच्या शासकीय दालनात विनापरवानगी व चिठ्ठी शिवाय प्रवेश करू शकता तो अधिकारी म्हणजे....

 


पुणे - आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जातीसमुहांचा    विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण विभाग कार्यरत आहे.प्रत्येक जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे कार्यालय आहे त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त असे   महत्त्वाचे पद असते


या पदावर विशाल लोंढे साहेबांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याला कारण हे तसेच आहे, जेव्हा विशाल लोंढे साहेब हे कोल्हापूर समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी दालनाच्या बाहेर पाटी लावली होती, त्या पाटीचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत होते काय लिहिलं होतं ते असं,"विनंतीपूर्वक सुचना - हे कार्यालय आपले असुन,मी व माझे अधिनास्त अधिकारी, कर्मचारी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत.माझ्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी आपणास कोणत्यातरी पुर्वपरवानगीची अथवा चिठ्ठी देण्याची गरज नाही "आता पुन्हा अशीच पाटी पुणे कार्यालयात सुद्धा झळकत आहे,


विशाल लोंढे साहेबांनी पुण्यात पदभार स्वीकारल्यानंतर ते असे म्हणतात की,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे पदावर हजर होताना, जन सामान्यांना आधी त्यांचे अधिकार बहाल केले, त्यांच्या साठी माझ्या कार्यालयाचे आणि दालनाचे दरवाजे विना परवानगी खुले केले, आणि मगच दालनामध्ये प्रवेश केला..

याची सुरुवात मी, शाहूंची भूमी कोल्हापुरातून केली होती.. आता महात्मा फुले आणि सावित्री माईंच्या पुण्यातही सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करेन.. पुणेकरांची साथ असावी, एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️