बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र अतिशभाई खराटे यांना "महाराष्ट्र गौरव पुरस्कार"


मुंबईत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान

मुंबई(सुवर्ण दिप वृत्तसेवा) -  संपूर्ण महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराच्या सामाजिक, राजकीय चळवळीत आपल्या प्रखर भूमिकेने व निष्ठेने सक्रिय कार्य करणारे तथा वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव लोकनेते अतिशभाई खराटे यांना इंडियन सोशल मुव्हमेंट मुंबई यांच्या विद्यमाने "महाराष्ट्र गौरव पुरस्कार- 2023"  देऊन सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]

       पनवेल, मुंबई येथे इंडियन सोशल मुव्हमेंट द्वारा आयोजित भव्य कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी, कामगारांच्या, महिलांच्या, युवकांच्या, बेरोजगारांच्या तथा शोषित, वंचित, पीडित बहुजन जनतेच्या न्याय हक्कासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, भूमिहिनांच्या भूमीहक्कासाठी करीत असलेल्या अविरत संघर्षमय लढ्याचा सन्मान म्हणून असि. पोलीस कमिशनर अशोक राजपूत साहेब यांच्या हस्ते तथा पनवेल महापालिका उपायुक्त गावडे साहेब, क्राईम ब्रँच पी.आय. शिर्लेकर साहेब, इंडियन सोशल मुव्हमेंटचे संस्थापक आनंदा ओव्हाळ, अध्यक्षा सविताताई सोनवणे, प्रदेश अध्यक्ष प्रकाश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर जी.बुलढाणा येथील अतिशभाई दयाभाई खराटे यांना सन्मानपत्र, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्हासह "महाराष्ट्र गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला.[ads id="ads2"]

         अतिशभाई खराटे यांनी सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्यामुळे यापूर्वी त्यांना क्रांतीरत्न, समाजभूषण, महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार, समाजरत्न या प्रमुख पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळालेले आहेत 

       वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तथा प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीपभाऊ वानखेडे,  जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या मार्गदर्शनाखाली आतिशभाई खराटे यांचा वंचित, शोषित, बहुजनांच्या न्यायासाठी लढा देण्याचा अविरत संघर्ष सुरूच आहे त्या संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांना न्याय दिला याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

             या कार्यक्रमाप्रसंगी एपीआय शाम कदम, आगरी कराडी संघटना अध्यक्षा प्राजक्ता गोवारी, इझम तालुकाध्यक्ष नरेश परदेशी, यशवंत वाघ, जिल्हा संघटक वसंत मोहिते, युवा नेते संजय जाधव, मीडिया प्रमुख गौतम सवार, कामगार सेना अध्यक्ष अक्षय साळवे, शाहीर सुनील कदम, विजय नाईक, गणेश कातकरी, शाम कातकरी, तकदीर भोपी, राजेश कातकरी आदि उपस्थित होते

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️