चांदवडचा जवान काश्मीरमध्ये शहीद, चांदवड तालुक्यात शोककळा ; शासकीय इतमामात उद्या अंत्यसंस्कार

 


नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :---  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र भारतीय सैन्य दलाचे जवान विकी अरुण चव्हाण वय वर्षे 24 हा दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी शुक्रवारी ग्रोको रोमन रेसरलचा (कुस्तीपटू) सराव करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रात्री उशिरा त्यांच्या घरच्यांना कळविण्यात आली. त्यामुळे शहीद जवानाच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे.[ads id="ads1"]

        शहीद जवान विकी चव्हाण चे पार्थिव देह रविवारी दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी रात्रीच्या सुमारास उशिरा दिल्लीहून मुंबईला पोहोचणार आहे. त्यानंतर तेथून ओझर विमानतळ येथे आणण्यात येईल. दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सोमवारी हरनुल येथे आणणार असून त्यानंतर शासकीय यतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती चांदवड तहसील कार्यालयाचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.[ads id="ads2"]

       चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र शहीद जवान विकी चव्हाण हे सन 2018 मध्ये भारतीय सैन्य दलाच्या 14 महार बटालियन मध्ये  शिपाई पदावर भोपाळच्या सागर येथे भरती झाली होते. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून ते जम्मू-काश्मीर राज्यातील पूंछ (राजुरी) येथे कार्यरत होते. विकी चव्हाण यास लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. त्यामुळे सैन्यात भरती झाल्यावर ग्रोको रेसला स्पर्धेसाठी ते तयारी करीत होते. येथील स्पर्धेनंतर ते अंतरराष्ट्रीय ग्रोको रेसला स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी जाणार होते. यासाठी त्यांचा दररोज सराव सुरू होता. दिनांक 8 सप्टेंबर 2023 शुक्रवारी स्पर्धेचा सराव करीत असताना ते गंभीर जखमी झाली होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विकी यांचे आंतरराष्ट्रीय ग्रोको रोमन रेसलर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे. जवान विकी अरुण चव्हाण देवळालीच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून त्याने कुस्तीचे प्रशिक्षण भगुर येथील बलकवडे व्यायाम शाळेत झालेले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️