दोन दुचाकींच्या धडकेत रावेर तालुक्यातील विद्यार्थी ठार : काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेदरम्यान घडला अपघात

दोन दुचाकींच्या धडकेत रावेर तालुक्यातील विद्यार्थी ठार : काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेदरम्यान घडला अपघात


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : खिरोदा ते सावदा दरम्यान काढण्यात आलेल्या काँग्रेस रॅलीदरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडकहोऊन भुवनेश दालुराम चेजारा (कुमावत ) वय १९ वर्ष रा. भोकरी ता. रावेर, मूळ रा. राजस्थान) हा विद्यार्थी ठार झाला. हा अपघात मंगळवार दिनांक १२ रोजी दुपारी झाला. भुवनेश हा फैजपूर येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचा (Dhanaji Nana Chaudhari College,Faijpur) विद्यार्थी होता.[ads id="ads1"]

काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी खिरोदा ते सावदा दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात फैजपूर येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयातील बीसीएचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी भुवनेश चेजारा याच्यासह अन्य विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. ही रॅली सुरू असताना सावदा ते कोचूर दरम्यान भुवनेश व त्याचा मित्र हे जात असलेल्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दोघेही खाली कोसळले. [ads id="ads2"]

  अपघातानंतर मागून येणाऱ्या मित्राने हा अपघात पाहिला व दोघांना उठविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हेदेखील तेथे आले व त्यांनी दोघांना चारचाकी वाहनात टाकून रुग्णालयात हलविले.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान

हेही वाचा : पोस्कोच्या गुन्ह्यात अटक आरोपीचा भुसावळ कोर्टाने अखेर केला जामीन रद्द

हेही व्हिडिओ बातमी पाहा: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली रावेर-यावल संवाद यात्रेदरम्यान भाजपवर जोरदार टीका

भुवनेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या वेळी रुग्णालयात मयताचे नातेवाईक व मित्रांची मोठी गर्दी झाली होती.अपघातानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवित असताना धडक देणाऱ्या दुचाकीचा चालक व मागे बसलेली महिला नंतर कोठे निघून गेले, हे समजू शकले नाही, असे मयताच्या मित्राने सांगितले. दरम्यान, या घटनेबद्दल रावेर - यावल चे आमदार शिरीष चौधरी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️