नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : नांदगाव तालुक्यात जनावरांना लांपीच्या आजाराला सुरुवात झाली असून लंपी आजारापासून जनावरांची मुक्तता करण्यासाठी नांदगाव पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय यंत्रणेमार्फत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथे जनावरांसाठी लंपी आजार होऊ नये म्हणून कॅम्प अद्याप पर्यंत घेण्यात आलेला नाही. [ads id="ads1"]
मौजे रोहिले बुद्रुक येथे एक ते दोन जनावरांना लंपी आजाराची लागन झाली असल्याचे समोर येत असून येथील जनावरांना लंपी आजार होऊ नये म्हणून व झालेल्या जनावरांना आजारापासून दूर करण्यासाठी त्वरित लसीकरण करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामपंचायत सरपंच ठकुबाई देविदास पवार, उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल व ग्रामस्थ यांनी केली आहे.[ads id="ads2"]
वेळीच नांदगाव पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास व येथील जनावरे बळी गेल्यास नांदगाव पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी व यंत्रणा जबाबदार राहील असे देखील पुढे बोलताना म्हटले आहे