मुक्ताईनगर जवळ झालेल्या विचित्र अपघातात पूर्णाड येथील दोन ठार तर चार जण गंभीर जखमी

मुक्ताईनगर जवळ झालेल्या विचित्र अपघातात पूर्णाड येथील दोन ठार तर चार जण गंभीर जखमी


मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात आज दिनांक १९ रोजी दुपारी पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी झाले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड (Purnad Taluka Muktainagar) येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर(Civil Hospital Muktainagar) येथे आणण्यात आलेले होते त्यांना बघून पूर्णाड गावी परतत असताना रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांचा समोरून येणाऱ्या कमलेश सुभाष पाटोळे,लिलाबाई सुभाष पाटोळे,मनीषा सुभाष पाटोळे यांच्या गाडीला समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला त्या पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा या गाड्यांवर आदळल्यामुळे विचित्र अपघात होऊन त्यामध्ये अशोक गंगाराम सावळे हे हे सुद्धा गंभीर जखमी झालेले आहे.[ads id="ads1"]

या अपघातात रोहित मुकेश गाढे वय 19 पूर्णाड तसेच प्रदीप छगन वाघ वय 28 पूर्णाड असे दोघे मयत झालेले असून कमलेश सुभाष पाटोळे मनीषा सुभाष पाटोळे लिलाबाई सुभाष पाटोळे चांगदेव तसेच अशोक गंगाराम सावळे पातोंडी ता.रावेर(Patondi Taluka Raver) येथील रहिवासी गंभीर जखमी झालेले होते.

हेही वाचा : फैजपूर परिसरातील सर्व धर्मीयांनी सण आनंदाने साजरा करावा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी

अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय(Civil Hospital Muktainagar) गाठत जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष एडवोकेट रोहिणीताई खडसे यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर गाठून जखमी रुग्णाची भेट घेतली.[ads id="ads2"]

  त्यावेळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात (Civil Hospital Muktainagar) अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली एकाच गावातील आधी एकाने आत्महत्या केल्यामुळे आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे

व्हिडिओ बातमी (पहा)

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️