एकूण रिक्त जागा : 626
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) आरोग्य पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केले असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
[ads id="ads1"]
2) आरोग्य सेवक (पुरुष) ४०% –
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.
3) आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) –
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन २० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम | यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.
4) आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला) –
शैक्षणिक पात्रता : ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
[ads id="ads2"]
5) औषध निर्माण अधिकारी –
शैक्षणिक पात्रता : औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
6) कंत्राटी ग्रामसेवक –
शैक्षणिक पात्रता : किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य महंता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती संगणक हातळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संकलनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण कर आवश्यक राहील.
7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) –
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका | तीन वर्षाचा पाठक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
8) कनिष्ठ लेखाधिकारी –
शैक्षणिक पात्रता : ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही | सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
12) पशुधन पर्यवेक्षक –
शैक्षणिक पात्रता : संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा (ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. (१) त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम (२) पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधीक कृषि विद्यापीठे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम (३) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम (आणि), (४) खालील संस्थांनी चालविलेला पशुवैद्यक शास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका या मधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम. (एक) महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, किंवा (दोन) राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठे किंवा किंवा ५) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण| माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
13) प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
शैक्षणिक पात्रता : ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
14) वरिष्ठ सहाय्यक –
शैक्षणिक पात्रता : संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार
15) वरिष्ठ सहाय्यक लेखा –
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणा-या अथवा पहिल्या किंवा दुस-या वर्गातील पदवी धारण करणा-या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
16) विस्तार अधिकारी (कृषि) –
शैक्षणिक पात्रता : ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) –
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम १) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा २) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा ३) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा ४) आरेखक (स्थापत्य) हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा ५) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18-38वर्षे, मागासवर्गीय उमेदवार: 18-43 वर्षे.
परीक्षा फी : खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.1000/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.900/-
अनाथ उमेदवारांसाठी: रू.900-
पगार : 19,900/- ते 1,12,400/- पर्यंत.
नोकरीचे ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : zpjalgaon.gov.in