राज्यस्तरीय सर्पमिञ संमेलनाला महाराष्ट्रातून पाचशे बावीस सर्पमिञांचा सहभाग
लातूर प्रतिनिधी : सर्पमिञांना सरकारने शासन स्तरावर अधिकृत ओळख द्यावी या प्रमुख मागणीसाठी लातूरात राज्यस्तरीय सर्पमिञ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यातून पाचशे हजारो सर्पमिञांनी सहभाग नोंदविला होता. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लातूरचे माजी महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे उपस्थित होते ते उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगत होते कि सर्पमिञ हि आता समाजाची निकडीची गरज होत चालली आहे. ते आपले वैयक्तिक जिवन विसरुन आपला जिव धोक्यात घालून साप पकडतात त्यांच्या शिवाय घरातला साप काढणे शक्य नाही तर सर्पमिञांची सरकारने शासन स्तरावर ओळख द्यावी हि मागणी रास्त असुन मि तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तुमच्या सोबत आहे असे आश्वासित केले आहे. [ads id="ads1"]
संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावर श्री राम भुतकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ दिलीप पुंडे, अनिस राज्य कार्यवाहक माधव बावगे, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक श्री अनिल कांबळे, दगडुसाहेब पडिले, सर्पमिञ अशोक शेट्टी, कृष्णा घुले, सुभाष घुले, नागेश जाधव, धनंजय गुट्टे, ॲड राहुल कांबळे, डाॅ महेश शिंदे यांची उपस्थिती होती. तर डाॅ दिलीप पुंडे यांनी सर्पंशावरील उपचार, सर्पदंशाने कोमात गेलेले रुग्ण शहाण्णव तासानंतर पण बरे होतात त्याचे जिवंत उदाहरणे आपल्या सञात दाखवली. सर्पदंश होऊ नये यासाठी काय उपचार पद्धती अवलंबल्या जातात याचे प्रात्यक्षिकांसह स्पष्टिकरण दिले आहे. सर्प विज्ञान चळवळ काल आज आणि उद्या या विषयावर सर्पमिञ हि संकल्पना देशात कशी आली यावर मत व्यक्त केले तर कर्नानटकातील अगुंबे येथे किंग कोब्रा सापाचे प्रजनन प्रक्रिया केंद्रातील तज्ञ श्री अजय गिरी यांनी सापाला हात न लावता साप कसा पकडायचा याचे नव्याने विकसित केलेले तंत्र त्यांनी दाखवले यामुळे साप मरणार नाही आणि सर्पमिञांना सर्पदंश होणार नाही याची व्यक्त केली. साप वन्यजीव व कायद्या बाबत ॲड राहुल कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. तर या संमेलनात सर्वानुमते सर्पमिञांना शासन स्तरावर अधिकृत ओळख निर्माण करुन द्यावी, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत किमान मानधनावर स्वयंसेवक म्हणून सक्रिय करावे, सर्पमिञांना आरोग्य विमा, अपघात विमा व सुरक्षा साधणांसाठी निधी राखीव करावा या मागण्यांबाबत सकारात्मक ठराव पारित करण्यात आला.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे सुञ संचलन सुशील वाघमारे यांनी तर आभार दगडुसाहेब पडिले यांनी व्यक्त केले. संमेलनासाठी सोलापूर चे निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांच्या समवेत सर्पमित्र रविचंद्र स्वामी, सर्पमित्र श्रीकांत बनसोडे, सर्पमित्र औदूंबर गेजगे, सर्पमित्र सुनिल अरळीकट्टी, सर्पमित्र इम्रान पटेल, तेजस दावणे,राजन खुर्द,आनंद गायकवाड,चंद्रकांत सगरे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.