महसूल सप्ताह सांगता समारोप कार्यक्रमात युवा प्रबोधनकार गजेंद्र गवई यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हाधिकारी यांचे हस्ते विशेष सन्मान


बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान  महाराष्ट्र शासन , महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह विविध नियोजित उपक्रम व कार्यक्रमाने जिल्हास्तर ते तालुकास्तरावर राबविन्यात आला.[ads id="ads1"]  

सदर महसूल सप्ताह चां सांगता समारोपिय समारोह कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचे वतीने जिल्हा नियोजन समिति सभागृह येथे आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मा डॉ. एच. पी. तुमोड साहेब तर प्रमुख उपस्थिति निवासी उप जिल्हाधिकारी सदाशिव शेलार साहेब, उपजिल्हाधिकारी महसूल शरद पाटिल,  उपजिल्हाधिकारी   भूसंपादन राजेन्द्र पौळ,उपजिल्हाधिकारी भुसंपादन श्री थोरात साहेब,श्रीमती माया माने तहसीलदार (महसूल) यांची होती.[ads id="ads2"] 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावरिल मान्यवरा चां सत्कार करून याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे महसूल कर्मचारी,महसूल कर्मचारी गुणवंत पाल्य, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सन्मान करण्यात आला.महसूल कर्मचारी यांनी सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महसूल तहसीलदार  श्रीमती माया माने मैडम यांनी केले.याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी सदाशिव शेलार साहेब यांचे सह जिल्हाधिकारी साहेब यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी लोकशिक्षण सांस्कृतिक कला संच, मातृभूमि कला संच च्या युवा लोकशाहीर,प्रबोधनकार गजेंद्र गवई व संचाचे विविध लोककला प्रकार सादरिकरन करण्यात आले , ज्यामध्ये महाराष्ट्र गीत, बुलडाणा जिल्हा गौरव गीत,भारुड, गोंधळ, पोवाड़ा, बतावनी , संवाद विनोद याद्वारे शासन आपल्या दारी या उपक्रमा सह महसूल सप्ताह याबाबत  बहारदार पणे प्रबोधित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या आयोजन व सादरिकरनासाठी युवा लोकशाहीर गजेंद्र गवई यांचा मा जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुममोड साहेब यांचे हस्ते विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला.

सदर कलासंचात लोकशाहीर गजेंद्र गवई सह रविकिरण मोरे, अमोल दिशागज,शाहिर मल्हारी गवई, किशोर मैंद, सिद्धार्थ गवई, अनंत गि-हे,राजू हिवराले, विलास गवारगुरु, सत्यपाल गवई,सागर खरात,गायिका कल्पना सिरसाठ, गायिका ज्योति मिसाल, यांचा सहभाग होता.कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन हेमंत पाटिल  नायब तहसीलदार खामगांव यांनी केले व आभार मानले.सदर कार्यक्रमास बहुसंख्य महसूल कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️