चाळीसगाव येथे सत्यशोधक संघाचे सार्वजनिक सत्यधर्मीय विधिकर्ते प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न !...


चाळीसगाव प्रतिनिधी - प्रा.पंकज पाटील सर

चाळीसगांव - शहरातील राष्ट्रीय विद्यालय येथे  सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्रातील तिसरे सार्वजनिक सत्यधर्मीय प्रबोधन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे होते. प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मा. संदीप पाटील साहेब, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष काकासो. आर. डी. चौधरी,  ह.भ.प. सत्यशोधक भगवान पांडुरंग माळी गुरुजी उपस्थित होते. [ads id="ads1"] 

     मान्यवरांच्या हस्ते लोक कल्याणकारी राजा महात्मा बळीराजा, छत्रपती शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सत्यशोधक समाज संघाच्या वतीने प्रमुख अतिथींचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम सत्यशोधक समाजाच्या प्रार्थनेने शिबिराची सुरुवात करण्यात आली. यानंतर खंडेरायाची तळी भरण्यात आली. उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आपापला परिचय करून दिला.[ads id="ads2"] 

 सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते साळूबा पांडव, भगवान रोकडे, भगवान बोरसे यांनी सार्वजनिक सत्यधर्म विधीकर्ते निर्माण करण्यासाठीचे प्रशिक्षण विस्तृतपणे दिले. यामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह सोहळा, हळदी समारंभ, सत्य पूजा, गृहप्रवेश, दशक्रिया विधी इत्यादी विधींचे कृतीयुक्त प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिराला नाशिक येथील राजेंद्र बाबुराव निकम, भालचंद्र भिका महाजन, वाघळी येथील राजेंद्र दादासाहेब माळी, वाडे येथील देविदास धर्मा महाजन, पातोंडे येथील रिद्धी भगवान रोकडे यांचा समावेश होता.

सर्व प्रशिक्षणार्थींना सत्यशोधक समाज संघाच्या वतीने सत्यशोधक विधी पुस्तक, सहभाग प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रशिक्षण शिबिर यशस्वीतेसाठी सत्यशोधक कैलास भगवान जाधव, भगवान रोकडे, शिवदास महाजन, विजय लुल्हे, पी डी पाटील यांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार विजय लुल्हे यांनी मानले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️