शिक्षणाच्या माध्यमातून लोकशाहीचे संगोपन आणि संवर्धन होणे आवश्यक - प्रा डॉ अनिता रामपाल यांचे 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' निमित्ताने आवाहन

 

नाशिक रोड (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील बिटको महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन आणि आय. क्यू. ए. सी. व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 19 ऑगस्ट 2023 रोजी 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' निमित्ताने दिल्ली विद्यापीठातील शिक्षणशास्त्र शाखेच्या माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिता रामपाल यांचे 'नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि समानता, अनेकता व चिकित्सक अध्यापनपद्धती समोरील गंभीर प्रश्न' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. [ads id="ads1"] 

या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. अनिता रामपाल म्हणाल्या की नवीन शैक्षणिक धोरणातील अनेक बाबी चिंताजनक आहेत. स्पर्धात्मक युगात शैक्षणिक संस्थाना मूल्यमापनाद्वारे दिल्या जाणार्‍या विविध श्रेणी या समानता आणि विविधता गृहीत धरत नाही. ज्ञान आणि कौशल्ये यात या नवीन शैक्षणिक धोरणात तफावत दर्शविली आहे परंतु खरे तर तशी तफावत करता येत नाही. 

प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली आधारित ठराविक साच्याचे आणि विज्ञानाने प्रमाणित न केलेले अभ्यासक्रम प्राथमिक ते उच्च शिक्षणात अनिवार्य केले जात आहेत. खरे तर देशात प्रचंड विविधता असतांना त्या विविधतेचा अंतर्भाव शैक्षणिक धोरणात केला गेला नाही.[ads id="ads2"] 

शालेय माध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांच्या आहारात फक्त शाकाहारी अन्नपदार्थ द्यावे असे विद्यार्थ्याची गरज किंवा आहारसंस्कृती लक्षात न घेता अनिवार्य केले जात आहे त्यामुळे अन्नाची नेमकी व्याख्या लक्षात घेतली पाहिजे. माध्यान्ह भोजन योजना फक्त विद्यार्थ्यांचे भरणपोषण करीत नसून सामाजिक अभिसरणाचा तो अप्रत्यक्षपणे अतिशय महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या माध्यमातून हुकूमशाहीप्रमाणे चालू असून विविध राज्यांना त्यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आवश्यक नसून त्याची अंमलबजावणी पुरेसा अभ्यास न करता सुरू आहे. विद्यार्थी नियमित शिक्षण घेत असतांना कौशल्याधारित कोर्सेस कशा पद्धतीने घेवू शकतील याची समस्या दिसते आहे. 

शिक्षणाच्या माध्यमातून लोकशाहीचे संगोपन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. राजश्री नाईक, आभारप्रदर्शन प्रा. निलेश महाजन आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोरी धुमाळ यांनी केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आकाश ठाकूर आणि सायन्स असोसिएशनचे सदस्य प्रा. राहुल उपळाईकर, प्रा.डॉ. दिनेश बोबडे, प्रा. गणेश दिलवाले, प्रा. प्रणाली पंडित, प्रा. नरेश पाटील, प्रा.डॉ. हेमंत भट, प्रा.डॉ. कैलास बोरसे तसेच प्रा.डॉ. विशाल माने, प्रा.डॉ. सतीश चव्हाण, प्रा.डॉ. दिलीप शिंपी, प्रा.डॉ. सुरेश कानडे, प्रा. डॉ. विद्या हांडे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️