यावल नगरपरिषद प्रशासक,मुख्याधिकारी यांच्या कालावधीत नदी,नाले सफाईचा देखावा तो पण आगस्ट महिन्यात


नदीतील मातीयुक्त कचरा घनकचरा डेपोत लाखोचे बिल काढले जाणार..?

यावल ( सुरेश पाटील ) पावसाळ्यापूर्वी नदी,नाले साफसफाईचे शासनाचे आदेश असताना मात्र यावल नगर परिषदेने यावल नगरपरिषद प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्या कालावधीत शासनाची शुद्ध दिशाभूल व फसवणूक करीत यावल तहसील कार्यालयाच्या मागील अडकाई खळकाई नदीच्या आवारातून मातीयुक्त कचरा यावल नगर परिषदेच्या घनकचरा डेपोवर वाहतूक करून वजन माफ करून ओला व सुका कचरा दाखवून लाखोचे बिल काढण्याचा घाट रचला गेला आहे.[ads id="ads1"] 

   यात प्रशासक मुख्याधिकारी यांना ही कार्यवाही माहीत नाही का असा प्रश्न सुद्धा संपूर्ण यावल शहरात उपस्थित केला जात आहे? यावल नगरपरिषद प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलक मुख्याधिकारी निकम यांनी हे काम तातडीने थांबवून चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी सुद्धा राजकारणातून आणि समाजातून होत आहे.[ads id="ads2"] 

       शासनाच्या नियमानुसार घनकचरा डेपोवर ओला आणि सुका कचरा वाहतूक करतानाच वर्गीकरण करून तो कचरा डेपोवर टाकला जातो. परंतु यावल नगरपरिषदेने नगरपरिषद कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर आणि यावल तहसील कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील नदीतून कचरायुक्त माती,कचरा जेसीपी मशीन ने उत्खनन करून ट्रॅक्टर मध्ये भरून वजन काट्यावर मोजमाप करून वाहतूक करून कचरा डेपोत आणण्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला या ठेक्यांमध्ये यावल नगरपालिकेचे कोट्यावधी रुपयाचे आर्थिक नुकसान होणार आहे या संपूर्ण प्रकरणाची यावल नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी यांनी कार्यवाही न केल्यास पुढील कारवाईस संबंधित सर्व जबाबदार राहणार असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात बोलले जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️