राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडविणारी बातमी समोर आली आहे. हि घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रात्री जेवणानंतर वॉकसाठी गेलेले असतांना त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज विष्णु चंदनशिवे असे अधिकारीचे नाव असून यांची कुणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मयत चंदनशिवे सांगली शहर पोलीस दलात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मूळगावी आले होते. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.[ads id="ads1"]
मयत चंदनशिवे हे रात्री जेवून झाल्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास वॉकसाठी गेले. यावेळी उसाच्या शेतात आधीच दबा धरुन बसलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात चंदनशिवे यांचा जागीच मृ्तयू झाला. बराच वेळ झाला तरी चंदनशिवे घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांना फोन लावला तर बंद येत होता. घरच्यांना काहीच थांगपत्ता लागत नव्हता.[ads id="ads2"]
आज पहाटेच्या सुमारास सांगोला-वासूद रस्त्याच्या लगत चंदनशिवे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.