यावल ( सुरेश पाटील ) यावल नगरपरिषदे पासून काही अंतरावर आणि यावल तहसील पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकाई खडकाई नदी पात्रात मृत जनावरे आणून टाकली जात असल्याने याकडे यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे, पर्यायी यावल शहरात साथीचे रोग फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.[ads id="ads1"]
यावल नगरपरिषद कार्यालयाला लागून असलेल्या नदीपात्रात आणि यावल तहसील कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रात यावल शहरात मृत झालेल्या गाई- म्हशी,कुत्रे,डुकरे,इत्यादी प्राणी नदीत आणून टाकले जात आहेत,पावसाळ्याचे दिवस असल्याने या मृत प्राण्याचे अवशेष नदीतून उत्तरेकडे म्हणजे यावल शहराकडे नगरपालिका कार्यालयाकडे वाहत येऊन साथीचे मोठे रोग फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.[ads id="ads2"]
मृत जनावरे फेकून देणारे हे यावल नगरपालिकेने निश्चित केलेले कंत्राटी मजूर असतील त्यांच्याकडे यावल नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने ते कर्मचारी मृत जनावरे कुठेही कसेही कोणत्याही अवस्थेत फेकून देत आहे याकडे तसेच संपूर्ण यावल शहरात पावसाळ्यात ओलाव्यामुळे मच्छर,डास इत्यादी कीटक निर्माण झाले असून यावल नगरपरिषदेने आपले लक्ष केंद्रित करून संपूर्ण यावल शहरात प्रभागा- प्रभागात कीटकनाशक फवारणी तात्काळ करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.