पी आर सोनवणे यांना दिला शाळेने निरोप !.....महात्मा फुले हायस्कूल येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न !....

पी आर सोनवणे यांना दिला शाळेने निरोप !.....महात्मा फुले हायस्कूल येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न !....

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर

धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका तथा माजी प्रभारी मुख्याध्यापिका पी आर सोनवणे हे नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२३ रोजी ३३ वर्ष सेवेतुन सेवानिवृत्त झाले. शाळेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले.[ads id="ads1"] 

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. निरोपार्थी ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, प्रमुख अतिथी डॉ.आर.टी. सोनवणे, माळी समाजाचे माजी सचिव दशरथ महाजन, माळी समाजाचे विश्वस्त विजय महाजन, माझी नगराध्यक्षा सुरेखाताई महाजन उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या वतीने निरोपार्थी शिक्षिका पी आर सोनवणे  यांना सहपत्नीक भेटवस्तू, साडी, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.[ads id="ads2"] 

           याप्रसंगी माळी समाजाचे विश्वस्त विजय महाजन, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे, पी डी पाटील, व्ही टी माळी, एस व्ही आढावे यांनी सोनवणे मॅडम यांच्या 33 वर्ष सेवेतले प्रसंग व अनुभव कथन केले. निरोपार्थी पी आर सोनवणे यांनी आपल्या मनोगतात माझ्या शाळेने माझा सन्मान केला मी नेहमीच शाळेची ऋणी राहील. माझ्या विद्यार्थ्यांनी उंच पदावर जावे आपल्या परिवाराचे व शाळेचे नाव मोठे करावे हीच माझी गुरुदक्षिणा असेल. शाळेशी माझे अतूट नाते राहील आपण बोलावले तर मी नक्कीच शाळेत मार्गदर्शन करण्यासाठी येईल, मला शाळेची खूप आठवण येईल असे प्रतिपादन केले.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी पी आर सोनवणे यांच्या सेवेतील कार्याला उजाळा दिला. सावित्रीमाई प्रमाणे त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष केला. आपले कुटुंब, शाळा ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. मुलांना मध्यान्ह भोजनामध्ये गोड जेवण देण्यात आले व शेवटी जन्मदिनानिमित्त शाळेकडून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️