नांदगाव शहरातील आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी छगन भुजबळ यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन केला सत्कार



नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :--  नांदगाव शहरातील आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी शनिवारी येवला येथे महाराष्ट्र राज्याचे हेवीवेट नेते तथा अन्नपुरवठा  मंत्री नामदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.[ads id="ads1"] 

        यावेळी आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटकुंजा स्वरूपात मानधन मिळते यात वाढ करावी, महिलांना सुरक्षितता द्यावी, विमा संरक्षण द्यावे, तसेच शिपाई पदावर नियुक्ती द्यावी या मागण्यासाठी छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. आणि शालेय पोषण आहारात कर्मचाऱ्यांना येणारे अडचणी संदर्भात चर्चा केली. यावेळी नामदार छगन भुजबळ यांनी बोलताना सांगितले की हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे यासाठी मी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करेल असे सकारात्मक उत्तर दिले.[ads id="ads2"] 

      याप्रसंगी आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संगीता संतोष सोनवणे, आशा शरद काकळीज, अलका आयनोर, रत्ना सोनवणे, संगीता मोकळ आदी यावेळी उपस्थित होत्या.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️