रावेर तालुक्यातील "या" गावात बिबट्याचा मुक्त संचार:बिबट्याने तीन शेळ्या केल्या ठार : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

 

रावेर तालुक्यातील "या" गावात बिबट्याचा मुक्त संचार:बिबट्याने तीन शेळ्या केल्या ठार : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील तापी नदीकाठावरील धुरखेडा (Dhurkheda Taluka Raver) येथे गेल्या चार पाच दिवसांपासून बिबट्याने मुक्त संचार करीत हैदोस घातला असून त्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या आहेत. [ads id="ads1"] 

तापी नदी (Tapi  River) काठी असलेल्या धुरखेडा(Dhurkheda )येथील दोन नागरिक यांच्या तीन बकऱ्या बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली आहे. यासाठी वन विभागाच्या(Forest  Officer) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट देवून पाहणी केली. पिंप्रीनांदू (Pimprinandu ) व धुरखेडा (Dhurkheda) येथील काही मजुरांना संध्याकाळी या गावाच्या शेती शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा मजूर वर्गात असुन शेती शिवारासह गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads2"] 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याच्याही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️