कृष्णा गीता नगर वासीयांच्या समस्या तात्काळ सोडवा : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील
धरणगांव - आज रोजी श्री मंगल कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आढावा बैठक संपल्यानंतर कृष्ण गीता नगरवासीयांनी आपल्या कॉलनीतील समस्या रस्ते क्रॉक्रीटीकरण, खांब्यावर पथदिवे, ओपनस्पेस मध्ये कंपाऊड, बालोद्यान, मुख्य चौकातहाय मास्ट लॅम्प , मुलांसाठी अभ्यासिका करणे अशा विविध समस्यांचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचला.[ads id="ads1"]
नामदार गुलाबराव पाटील साहेब यांनी प्रशासनाला कृष्ण गीता नगर वासियांच्या सर्व मुलभूत समस्या तात्काळ सोडवा असे आदेश दिले. याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, जे एस पवार, एस एन कोळी, अनिल कुलट, संजय सुतार, अजय मैराळे, पी डी पाटील, पंकज मिस्तरी तसेच सर्व कॉलनीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्याच्या आश्वासनानंतर लवकरात लवकर कॉलनी वासीयांची समस्या दूर होतील अशी आशा कॉलनीवासियांनी व्यक्त केली.