नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक माध्यमिक विद्यालयामध्ये ध्वजारोहण केला नाही. कारवाई करण्याची मागणी



नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथील नव्यानेच सुरू झालेल्या माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला नसून ध्वजारोहण करण्यात आले नाही. तरी माध्यमिक विद्यालयावर कायदेशीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.[ads id="ads1"] 

        रोहिणी बुद्रुक येथे यंदाच्या शैक्षणिक वर्षात माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले असून सदर विद्यालय कुटुंब राहत असलेल्या माडीवर भरत आहे. या माडीवर कै‌‌ . आसाराम बागुल गुरुजी माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक अशा नावाचे नामफलक नाम फलक लावण्यात आले असून या ठिकाणी भारत देशाचा असलेला तिरंगा ध्वजासाठी व्यवस्था करण्यात आलेली नसून दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले नाही.[ads id="ads2"] 

   प्रकारचा भारत देशाचा अपमान केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तरी या विद्यालय माध्यमिक विद्यालयाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी चर्चा गावात सुरू आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी खरोखर ध्वजारोहण करण्यात आले उघडकीस आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️