नागपंचमीनिमित्त निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचा उपक्रम
सोलापूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : नागपंचमीचे औचित्य साधून निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीने म.न.पा मराठी मुलांची शाळा क्र. २८ येथे,सोलापूर जिल्ह्यात आढळून येणारे अतिविषारी, निमविषारी व बिनविषारी सर्प अशा सर्व प्रकारच्या सर्पांची माहिती, ओळख, घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]
यावेळी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी पोस्टरव्दारे सर्व प्रकारच्या सर्पांची ओळख, त्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये, अंधश्रद्धा, गैरसमज याबाबत माहिती दिली व अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी विध्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.[ads id="ads2"]
संघटनेचे सर्पमित्र यश पांढरे, अनुराग लांबतुरे, सिद्धेश्वर मिसालेलू,अशरफ शेख, अक्षय रजपूत यांनी पोस्टर प्रदर्शन केले. यावेळी निसर्गप्रेमी संघटनेच्या सर्व सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना सर्पा बाबत माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील सर्पाची भीती दूर केली.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री कृष्णपरमेश्वर सुतार, श्री गौरीशंकर नारायणे सौ. सीमा जाधव,स्नेहल खराटे,लक्ष्मी भिमर्थी,अंजली नागणे,गणेश अंजिखने तसेच शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गौरीशंकर नारायणे यांनी केले. तर मुख्याध्यापक श्री कृष्णपरमेश्वर सुतार, यांनी आभार मानले.