अण्णाभाऊची साहित्यसंपदा शोषित पीड़ित उपेक्षित घटकांची वास्तव मांडणारी - गजेंद्र गवई

 


बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा  ही शोषित , पीड़ित, उपेक्षित ,वंचित कष्टकरी शेतकरी, शेतमजूर यांची वास्तव परिस्तिथि मांडनारी आहे त्यामुळे सर्व साहित्य बहुजन समाजाला दिशादर्शक व अन्याय अत्याचार विरुद्ध संघर्ष करायला प्रेरणा देते अशे प्रतिपादन प्रबोधनकार पत्रकार गजेंद्र गवई यांनी दे माली येथे आयोजित लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे 103 व्या जयंती दिनी आयोजित अभिवादन कार्यक्रमात केले.[ads id="ads1"] 

आज दिनांक १/८/२०२३ रोजी देऊळगाव माळी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या  जयंती कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.सदर जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर जगदीश बोरकर होते. कार्यक्रमा च्या सुरुवातीला उपस्थित सर्व गावकरी,समाज बांधव यांनी अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड भीमराव गवई यांनी केले .तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनेल चे प्रतिनिधी  पत्रकार गजेंद्र गवई यांनी अभ्यासपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. [ads id="ads2"] 

  कार्यक्रमाला आयोजक आशीष संजय बोरकर, भावेश बोरकर, मदन बोरकर, विशाल  डोंगरदिवे ,शुभम गवई ,संगपाल वानखडे, प्रशिक गवई , सुरज वानखडे, निखिल वानखडे, निलेश गवई , गजानन गवई, अमोल गवई, दिलीप बळी, सृष्टीराज बोरकर, विश्वराज बोरकर, आदर्श गवई, दीपक डोंगरदिवे, प्रमोद गवई व समस्त बोरकर परिवार उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड भीमराव गवई यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदिपकुमार बोरकर यांनी केले.कार्यक्रमास बहुसंख्येने समाजबान्धव गावकरी उपस्तिथ होते...

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️