नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर किल्ला वस्ती येथे शालेय 17 वर्षीय विद्यार्थिनीस मारहाण, नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपीवर गुन्हा दाखल



नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-  नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी जवळ असलेल्या नस्तनपुर किल्ला वस्ती येथे 17 वर्षीय शालेय विद्यार्थिनीसह कुटुंबीयाला मारहाण करण्यात आले असून, नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये याबाबत चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

         याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर किल्ला वस्ती येथील राहणारे सोनवणे कुटुंबीयातील एका अल्पवयीन 17 वर्षीय शालेय विद्यार्थिनींने नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 31 जुलै 2023 रोजी सोमवारी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, नस्तनपुर किल्ला येथे चार जणांनी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.[ads id="ads2"] 

   त्यामुळे नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये बालकाची लैंगिक संरक्षण कायदा अंतर्गत भादवी कलम 354, 143, 323, 504 प्रमाणे बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक 1 ऑगस्ट २०२३ रोजी मंगळवारी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र आरोपींना अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे फिर्यादीच्या वडिलांनी बोलताना सांगितले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️