11 तलवारींसह शस्त्रे जप्त; 5 जणांना अटक : जळगाव जिल्ह्यातील "या" ठिकाणची घटना

 


पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तब्बल ११ तलवारी व दोन धारदार गुप्त्या संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आहे.[ads id="ads1"] 

पोलिस संशयितांची कसून चौकशी करीत आहेत.अडावद पोलिस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित सागर भगवान महाजन (वय २२, रा.अडावद), राहुल लक्ष्मण ठाकरे (१९, रा.सुटकार), राज प्रमोद ठाकूर (२१, रा. लोणी, ता. चोपडा), चिरंजीव रवींद्र भोई (१९, रा.अडावद), मयूर रामेश्वर कोळी (२०, रा.अडावद) यांच्याकडून एकूण ११ धारदार तलवारी व २ धारदार गुप्त्या अशी एकूण १३ हत्यारांसह १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. [ads id="ads2"] 

या प्रकरणी रविवारी दिनांक १३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक जगदीश कोळंबे, 

उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक फौजदार शरीफ शेख, मुकेश तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, सुनील तायडे, नासिर तडवी, विनोद धनगर, फिरोज तडवी, किरण शिरसाठ, सतीश भोई, प्रदीप पाटील, शुभम बाविस्कर, संदीप पाटील, शैलेश माळी, रमिज सय्यद यांनी केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️