रावेर विधानसभा,लोकसभा सदस्यांचे 'स्वप्न' पाहणारे राजकीय भूतकाळ,वर्तमानकाळ भविष्यकाळाचा विचार करणार का..?


यावल  (सुरेश पाटील) रावेर विधानसभा व लोकसभा मतदारसंघ सदस्य पदाचे स्वप्न पाहणारे जे कोणी अपक्ष किंवा राजकीय पक्षाचे इच्छुक भावी उमेदवार आहेत ते आधी सन 1962 पासून अनुक्रमे यावल व आताचा रावेर विधानसभा क्षेत्राचा तसेच 1952 पासूनचा जळगाव लोकसभा मतदारसंघापासून तर आताच्या रावेर लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,औद्योगिक,सांस्कृतिक,संस्कृतीचा राजकारणाचा भूतकाळ, वर्तमानकाळाचा भविष्यकाळाचा विचार करणार आहेत किंवा नाही..? असे रावेर लोकसभा,विधानसभा मतदारसंघातील सर्व स्तरातील समाजात,राजकारणात बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

      रावेर विधानसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील शेतकरीवर्गासह सर्व जाती धर्मातील,सर्वस्तरातील मतदार हा फार 'हुशार' आणि 'चतुर' आहे,निवडणूक रिंगणात कोण कोणत्या राजकीय पक्षातर्फे किंवा अपक्ष उमेदवारी घेणार आणि मतदारसंघातील विविध प्रश्न कोण सोडविणार..? किंवा सोडवू शकतो..? याचा अभ्यास सर्व स्तरातील मतदारांना आहे राज्यातील व केंद्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मतदार आपल्या आवडत्या उमेदवारांलाच मतदान करून विजयी करीत असतात मग तो उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा, किंवा अपक्ष उमेदवार असो वैयक्तिक स्वार्थ व हेतू साध्य करणाऱ्या उमेदवारास मतदार प्राधान्य देत नाहीत,रावेर यावल तालुका आणि आताचा रावेर विधानसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील गेल्या 50 ते 60 वर्षाचा राजकीय इतिहास लक्षात घेता मतदार संघात दोन ते तीन वेळेस प्रबळ उमेदवारांना आणि नवख्या उमेदवारांना मतदारांनी डावलून काम करणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे.म्हणून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इच्छुक भावी उमेदवारांनी ओहर कॉन्फिडन्स न बाळगता आपल्या मतदारसंघातील भूतकाळ,वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा विचार, अभ्यास करून,मतदारांचा, नागरिकांचा नेमका कल कोणत्या बाजूने आहे याचा विचार करून निवडणूक रिंगणातील उमेदवारीचे स्वप्न पाहायला पाहिजे..? अन्यथा मतदार राजा हा आपल्या मतदार संघाचा हिताचा निर्णय घेईलच असे तुर्त राजकीय चित्र निर्माण झाले आहे.[ads id="ads2"] 

                 रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील मतदार किती हुशार आणि चाणाक्ष आहे याचा अभ्यास सन 1952 पासून सन 2019 पर्यंतचे माजी खासदार माजी आमदार यांना मतदारांनी कशी संधी दिली आहे याबाबत इच्छुक सर्व भावी उमेदवारांनी राजकारणातील भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा विचार करायला पाहिजे...? असे लक्षात येईल.

हेही वाचा: शिरसाळा मारुती दर्शनास गेलेल्या सावदा येथिल दोघे तरुण अपघातात ठार!

       लोकशाहीतील पहिली लोकसभा सन 1952 ते 1957 त्या वेळेला रावेर लोकसभा मतदारसंघ न होता जळगाव लोकसभा मतदारसंघ होता.त्यावेळेस पहिल्या लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे हरी विनायक पाटसकर विजयी झाले होते, त्यानंतर 1957 ते 1962 च्या कालावधीत जळगाव लोकसभा सदस्य खासदार म्हणून नौशेर भरूचा अपक्ष म्हणून,सन 1962 ते 67 या तिसऱ्या लोकसभेत काँग्रेसचे जे.एस.पाटील,चौथ्या लोकसभेत 1967 ते 71 यादरम्यान एस.एस.सय्यद काँग्रेस तर्फे,पाचव्या लोकसभेत सन 1971 ते 77 कृष्णराव पाटील,सहावी लोकसभा 1977 ते 1980 जनता पक्षातर्फे यशवंत बोरोले, अनुक्रमे सातवी आठवी नववी या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये 1980 ते 1991 कालावधीत यादव शिवराम महाजन आय काँग्रेस तर्फे,दहावी लोकसभा सन 1991 ते 1996 निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे गुणवंतराव रामभाऊ सरोदे, अकरावी लोकसभा सन 1996 ते 1998 पुन्हा दुसऱ्यांदा गुणवंतराव रामभाऊ सोनवणे, बारावी लोकसभा सन 1998 ते 99 काँग्रेस तर्फे डॉ.उल्हास वासुदेव पाटील,तेरावी लोकसभा सन 1999 ते 2004 व सन 2004 ते 2007 वाय.जी.महाजन सर भाजप तर्फे,चौदावी लोकसभा सन 2007 ते 2009 हरिभाऊ जावळे,पंधरावी लोकसभा सन 2009 ते 2014 ए.टी.नाना पाटील भाजपा तर्फे पुन्हा सोळावी लोकसभा दुसऱ्यांदा सन 2014 ते 2019 ए.टी.नाना पाटील.

       यानंतर सन सोळावी लोकसभा 2009 ते सन 2014 रावेर लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊन त्यात भाजपाचे हरिभाऊ जावळे,यानंतर सन 2014 ते 2019 व 2019 ते आज दि. 26 ऑगस्ट 2023 भाजप तर्फे रक्षा खडसे खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.

        याचप्रमाणे सन 1962 यावल विधानसभा मतदारसंघातून रमाबाई नारायणराव देशपांडे,सन 1967 मध्ये काँग्रेस तर्फे जीवराम तुकाराम महाजन सन 1972 मध्ये जीवराम तुकाराम महाजन,सन 1978 मध्ये जेएनपी पक्षातर्फे सिंधुताई चौधरी, काँग्रेस यु पक्षातर्फे 1980 व 1985 मध्ये जीवराम तुकाराम महाजन त्यानंतर 1990 मध्ये काँग्रेस तर्फे रमेश विठ्ठल चौधरी,1995 मध्ये काँग्रेस तर्फे रमेश विठ्ठल चौधरी,1999 मध्ये भाजपा तर्फे हरिभाऊ माधव जावळे, सन 2004 मध्ये काँग्रेस तर्फे रमेश विठ्ठल चौधरी.

         तसेच स्वतंत्र असलेल्या रावेर मतदार संघात 1962 पासून तर 1978 पर्यंत म्हणजे चार पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसतर्फे मधुकरराव धनाजी चौधरी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

        त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेस आय तर्फे रामकृष्ण रघुनाथ पाटील,1985 मध्ये भाजप तर्फे गुणवंतराव रामभाऊ सरोदे,1990 मध्ये काँग्रेस तर्फे मधुकरराव धनाजी चौधरी,1995 मध्ये भाजपा तर्फे अरुण पांडुरंग पाटील, 1999 मध्ये काँग्रेस तर्फे राजाराम गणू महाजन,सन 2004 मध्ये भाजप तर्फे अरुण पांडुरंग पाटील.सन 2009 मध्ये अपक्ष शिरीष मधुकरराव चौधरी,सन 2014 मध्ये भाजप तर्फे हरिभाऊ जावळे सन 2019 मध्ये काँग्रेस तर्फे शिरीष मधुकरराव चौधरी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत

       सन 2009 मध्ये नवीन रावेर विधानसभा मतदारसंघ निर्माण होऊन त्यात अपक्ष उमेदवार म्हणून शिरीष मधुकरराव चौधरी,सन 2014 मध्ये भाजप तर्फे हरिभाऊ माधव जावळे,सन 2019 मध्ये  काँग्रेस तर्फे शिरीष मधुकरराव चौधरी. विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

        अशाप्रकारे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इच्छुक भावी उमेदवारांनी गेल्या 50 ते 55 वर्षातील लोकसभा विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा आढावा घेऊन ओहर कॉन्फिडन्स न बाळगता किंवा वैयक्तिक मत मतदारांवर न लादता उमेदवारी घेतल्यास मतदारांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू शकतो असे रावेर विधानसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकारणात बोलले जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️