जळगाव जिल्हा पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर : पहा एका क्लिक वर

  • जळगाव जिल्हा पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रक्रियेचा निकाल विक्रमी वेळेत  प्रसिद्ध
  • पोलीस पाटील परीक्षेचा 7.30 तासात तर कोतवाल परीक्षेचा 4 तासात निकाल जाहीर 
  • प्रक्रियेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले अभिनंदन!

जळगाव  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदांसाठीची परीक्षा आज शहरातील ८ केंद्रावर सुरळीत पार पडली. पोलीस पाटील २२८० व कोतवाल पदांसाठी ११३५ उमेदवारांनी परीक्षा दिली.[ads id="ads1"] 

Jalgaon जिल्हाधिकारी आयुष प्रसाद देखरेखीखाली घेण्यात आलेल्या या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. पोलीस पाटील या पदाकरीता सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ८ केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली व कोतवाल पदाकरीता दुपारी ३ ते ४ या वेळेत ४ केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली.

भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी Jalgaon जिल्ह्यातील १५ तहसीलदार (कार्यकारी दंडाधिकारी) व ७ उपविभागीय अधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी) यांना गोपनीय स्थळी पाठवून त्यांना भरती प्रकिया पारदर्शकता राबविण्याकामी सूचना दिल्या. तसेच त्यांच्याकडून मोबाईल व इंटरनेट विरहीत काम करुन घेवून त्याठिकाणी २४ तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. [ads id="ads2"] 

 पोलीस पाटील या पदाकरीता एकूण २४६७ उमेदवारापैकी २२८० उमेदवार परिक्षेसाठी हजर व १८७ उमेदवार गैरहजर होते. व कोतवाल या पदाकरीता एकूण १२७८ उमेदवारापैकी ११३५ उमेदवार परिक्षेसाठी हजर व १४३ उमेदवार गैहजर होते.पोलीस पाटील या पदाच्या मुलाखतीसाठी समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांना स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात येणार आहे.

पोलीस पाटील (निकाल यादी)

कोतवाल (निकाल यादी)



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️