नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जयभोले नगर, करीम चाळ येथील नागरी समस्यांबाबत नांदगाव नगरपालिकेला वारंवार निवेदने देऊन देखील समस्या सुटत नाही. विनंती करून देखील नागरिकांच्या समस्यांकडे नांदगाव नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने महावीर जाधव यांच्यासह नागरिक व महिलांनी दिनांक चोवीस जुलै 2023 रोजी सोमवारी आंदोलनास सुरुवात केली. याबाबत नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांनी नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विविध धांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेले असता त्यांनी त्यास नकार दिला. म्हणजेच जाणून बुजून नांदगाव नगरपालिका प्रशासन नांदगाव शहरातील काही भागात जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून ग्रामस्थांना त्रास देत आहेत .[ads id="ads1"]
दिनांक 24 जुलै २०२३ रोजी सोमवारी नांदगाव नगरपालिकेसमोर इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जयभोले नगर, करीम चाळ या भागात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. नागरिकांना मुख्य बाजारपेठेत जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. कॉलनीतील एक शाळा आहे जिथे मुलांना आणि पालकांना त्यांच्या लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी खूप त्रास होतो. आजही रस्ता नाही. रेल्वे पुलाजवळ तिसऱ्या लाईनच्या कामामुळे या भागातील मुख्य रस्ता बंद आहे. काम पूर्ण झाल्यावर तो बंद केला जाईल. गेल्या दोन वर्षापासून लेंडी नदी पात्रात मोठा पूल व्हावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. दिनांक 11 मे 2022 आणि 25 जानेवारी 2022 रोजी येथील भागातील नागरिकांनी नांदगाव नगरपालिकेला निवेदन दिले होते.[ads id="ads2"]
नांदगाव नगर पालिकेसमोर बेमुदत कुपोषणा स्थळी भेट दिली असता पोषण कर्त्यांनी त्यांच्या नागरिक समस्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रतिक्रिया वरून नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. यावरून प्रशासन,शासन लोकप्रतिनिधी इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जयभोले नगर, करीन चाळ या भागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून त्रास देत आहे हे सिद्ध होते.