शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा शासन आपली दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार - राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
मुक्ताईनगर सह जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठवडा उलटूनही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत न मिळाल्यास शासन आपले दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारला दिला.[ads id="ads2"] 
   मुक्ताईनगर सह जिल्ह्यात ढगफुटी,पुरामुळे शेतकऱ्यांची पूर्णता वाहतात झालेली असून शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहे, शेती वाहून गेलेली आहे पिकं पूर्णतः उध्वस्त झालेली आहे तसेच नदीपात्रालगत गावातही पुरामुळे मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील हजारो शेतकरी बेघर झालेले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची घोषणा केली परंतु आठवडा उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे शिंदे सरकार हे फक्त घोषणा सरकार आहे की काय असा प्रश्न राजू शेट्टी  यांनी उपस्थित केला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️