ॲपे रिक्षा पलटल्याने रावेर तालुक्यातील "या" गावातील केळी कामगार मजूर महिलेचा मृत्यू ; चार जण जखमी

 ॲपे रिक्षा पलटल्याने रावेर तालुक्यातील "या" गावातील केळी कामगार मजूर महिलेचा मृत्यू ; चार जण जखमी


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : केळी कामगार मजूर घेऊन जाणारी  रिक्षा पलट क्याने एका महिलेचा मृत्यू झाला  तर चार जण जखमी झाले असून दोन्ही महिला गंभीर आहेत. सुनंदा गुलाब तायडे (वय- ६० ) रा. तामसवाडी तालुका - रावेर (Tamaswadi Taluka Raver Dist Jalgaon) असे मृत्यू झालेल्या केळी कामगार महिला मजुराचे नाव आहे.  [ads id="ads1"] 

गुरुवारी दिनांक २७ जुलै रोजी दिवसभर केळीचे घड वाहण्याचे मजुरीचे काम आटोपून रावेर तालुक्यातील तामसवाडी (Tamadwadi Tal Raver Dist Jalgaon) येथील मजूर ॲपे रिक्षाने रावेरवरून तामसवाडी येथील त्यांच्या घराकडे जात होते. बऱ्हाणपूर रस्त्यावरील बालाजी तोल काट्याजवळ सदरचा हा अपघात झाला आहे. खड्डा चुकवण्याचा प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा जागीच पलटी झाली. सदर हि घटना गुरुवारी संध्यकाळी सात वाजता घडली. [ads id="ads2"] 

  या अपघातात सुंनदा गुलाब तायडे हि केली कामगार मजूर महिला गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. तर सुलोचना हिरामण रायमळे,  रंजना पंडित रायमळे, राजू लक्ष्मण रायमळे, प्रवीण प्रकाश रायमळे हे चौघे जण जखमी झाले आहेत. सुलोचना रायमळे व रंजना रायमळे यांच्यावर बऱ्हाणपूर येथील तर राजू व प्रवीण रायमळे यांच्यावर रावेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रावेर येथील पोलीस ठाण्यात (Raver Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती रावेर पोलिस स्टेशनचे (Raver Police Station) पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली. कैलास नागरे यांच्या मार्गदशनाखाली पीएसआय इस्माईल शेख करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️