पिंप्री-नांदू गावाला लागूनच आलेली तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय युवकाचे नांव अक्षय जगन्नाथ महाजन (Morgaon Taluka Raver Dist Jalgaon) असे आहे.त्याने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या (Tapi River) पुलावरून त्याचा चुलत भाऊ समाधान महाजन यास फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती.याबाबत चुलत भावाने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तरीही अक्षय याने टोकाचे पाउल उचलले.[ads id="ads2"]
याबाबत ज्या मोबाईलवरून अक्षयने त्यांच्या चुलत भाऊ समाधानला कॉल केला होता, त्याच मोबाईलधारकाने काही वेळानंतर घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली.नातेवाईक तातडीने पुलाजवळ पोहचले मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असल्याने तो मिळून आला नव्हता.रविवारी दिनांक १६ जुलै रोजी सकाळी रावेर तालुक्यातील धूरखेडा येथील लोकांनी मृतदेह शोधून काढल्यावर,रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर
याबाबत निंभोरा पोलिसांत (Nimbhora Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत अक्षय याचे वडील जगन्नाथ महाजन हे रावेर तालुक्यातील केऱ्हाळे(Kerhale Taluka Raver Dist Jalgaon) येथील केळीच्या गृप मध्ये कामाला आहे. अक्षय हा एकुलता एक मुलगा होता.त्यांच्या पश्चात आई,वडील व बहिण असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येने मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.