यावल आठवडे बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ ; दर शुक्रवारी ४ ते ५ चोरले जात आहे मोबाईल

 


यावल  (सुरेश पाटील) यावल- चोपडा तथा बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्य महामार्गाला लागून यावल येथील आठवडे बाजारात दर शुक्रवारी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान ४ ते ५ व्यक्तीच्या खिशातून महागडे मोबाईल अज्ञात चोरटे हाथ की सफाई करून चोरून नेत आहेत यातील काही जण यावल पोलीस स्टेशनला तक्रार देतात तर काही जण देत नाहीत अशा तक्रारी असताना यावल पोलिसांना चोरटे सापडत नाही यामुळे यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"] 

          यावल तहसील पासून एक किलोमीटर अंतराच्या आत तसेच यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर शुक्रवारच्या दिवशी आठवडे बाजार भरत असतो. 50% आठवडे बाजार हा बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर भरत असतो प्रचंड रहदारीचा महामार्ग असताना सुद्धा महामार्गावर बाजार भरतो हे विशेष याकडे संपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून पोलीस बंदोबस्त राहत नसल्याने ट्राफिक जाम होत असते तसेच एखाद्या मालवाहतूक वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास एखाद्या वेळेस मोठी अनुचित घटना घडून जीवित हानी होऊ शकते.[ads id="ads2"] 

  तसेच आठवडे बाजारात महिलांचे मंगळसूत्र पुरुषांचे पैशांचे पाकीट आणि मोबाईल अज्ञात छोटे चोरून नेत आहेत दर शुक्रवारी बाजाराच्या दिवशी अज्ञात चोरटे ४ ते ५ मोबाईल चोरून धुमाकूळ घालत आहे परंतु यावल पोलीस त्यांना पकडू शकत नाही हे यावलकरांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.मोबाईल चोर व मंगळसूत्र,पोत चोरणारे चोरटे यावल शहरातील आहेत का..? बाहेर गावाहून येतात हे यावल पोलिसांना आढळून येत नाही..! याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️