अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सी ए परिक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवल्याने राहुल राहुजाचा सत्कार


साळवा प्रतिनिधी

             धरणगाव येथील राहुल मनोज राहूजने सी ए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याबद्दल धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा तसेच डॉक्टर अतुल सूर्यवंशी लिखित शोभा डे यांचा ग्रंथ देखील यावेळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.[ads id="ads1"] 

      अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठलाही क्लास न लावता स्वतःच्या मेहनतीने सी एची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल राहुलचे कौतुक होत आहे .

     यावेळी पाचोरा येथील प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी, कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी तसेच श्याम भाटिया, भूषण मेहर, प्रेमचंद मेहर, आनंद ज्ञानसागर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौधरी यांनी केले तर आभार शाम भाटिया यांनी मानलेत.[ads id="ads2"] 

     यावेळी सी ए व्हायची प्रेरणा हि मला माझ्या आईकडून मिळाली कारण आईचंही स्वप्न हे सी ए व्हायचं होतं. ते स्वप्न आईने माझ्या अंगी बघितले आणि आज मी ते पूर्ण करून सी ए झाल्याने राहुल मनोज राहुजा याने सांगितले. आई-वडील व गुरूजनांचे आभार मानले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️