जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत रावेर येथे केळी पीक संदर्भात बैठक

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दिनांक 12 जुलै सकाळी अकरा वाजता बैठक बोलावली आहे. [ads id="ads1"]

 या बैठकीत केळी उत्पादक शेतकऱ्यांचे विवीध प्रश्न जाणून घेवून ते मार्गी लावण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल हे स्वतः प्रयत्नशील आहेत. या बैठकीनंतर रावेर तालुक्यातील नागरिकांच्या भेटी , विवीध समस्या ,तक्रारी व निवेदने दुपारी साडे बारा वाजता जळगाव हे रावेर तहसील कार्यालयात स्वीकारणार आहेत. [ads id="ads2"]

 तर रावेर तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी रावेर तालुका स्तरावरील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक दुपारी दोन वाजता होणार आहे अशी माहिती रावेर चे तहसिलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️