महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीचा खून, पत्नी व मुलाला घेतले ताब्यात


नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-  पतीचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याची घटना नाशिक शहरातील इंदिरानगर भागातील पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर चौक, यशवंतनगर या ठिकाणी सोमवार दिनांक 9 जून 2023 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.[ads id="ads1"]  

         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत दादाजी गवळी वय वर्ष 41 राहणार समृद्धी प्लाझा, यशवंत नगर, दामोदर चौक, पाथर्डी फाटा मुळगाव साखरी जिल्हा धुळे यांचे नात्यातील एका महिलेची अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून पत्नी व त्यांच्या नेहमी भांडण होत असत. मध्यंतरी दोघांमध्ये वाद मिटवण्यात आले होते. मात्र त्यांची पत्नी संशयित आरोपी सुनीता गवळी वय वर्षे चाळीस व त्यांचा मुलगा निशांत गवळी वय वर्ष 20 यांनी तो राग मनात धरून सोमवार दिनांक 9 जून 2023 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बेडरूम मध्ये गाढ झोपेत असलेले मयत दादाजी गवळी यांच्या डोक्यात मुसळीने जोरदार प्रहार करत त्यांचा निर्दयपणे खून केला. दरम्यान सदरची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, इंदिरानगर पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले ‌[ads id="ads2"] 

       सदरच्या घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे. मयत दादाजी गवळी हे अंबड औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️