नांदगाव तालुक्याच्या राजकारणाची दिशा आता भुजबळ - कांदे यांच्या मनोमिलनावर ठरणार



नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-  सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सत्तासंघर्षाच्या  लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधील भूकंपाची हादरे भविष्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघाला बसणार आहेत. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. [ads id="ads1"] 

  शिवसेनेचा शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ही महायुती निर्माण झाली आहे. यापूर्वी छगनराव भुजबळ व नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी निधी वाटपासंदर्भात एकमेकांवर ताशेरे ओढले होते. सुहास कांदे आणि छगन भुजबळ दोघांचे या निमित्ताने मनोमिलन होईल का? याबाबत  मतदारांमध्ये संभ्रम अवस्था कायम आहे. छगन भुजबळ व सुहास कांदे तो कसा दूर करतात. यावर नांदगाव तालुक्यातील पुढील राजकारणावर अवलंबून राहणार आहे.[ads id="ads2"] 

        नांदगाव तालुक्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात प्रामुख्याने लढती झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अद्याप संभ्रमावस्थेत आहेत. नांदगाव तालुक्यात एक गट शरद पवार यांना मानणारा आहे. तर दुसरा गट अजित पवार यांना मानणार आहे. काँग्रेसचे नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अनिल दादा आहेर यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. माजी आमदार अनिल आहेर यांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले आहे. नांदगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, रिपाई आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह नव्यानेच आलेल्या भारत राष्ट्र किसान समिती (बी आर एस) पक्षानेही आपले वर्चस्व वाढविण्यासाठी सुरुवात केली आहे. या पक्षाच्या संपर्कामध्ये नांदगाव तालुक्यातील एक माजी आमदार असल्याची चर्चा आहे. संपूर्ण नांदगाव तालुक्यात भारत राष्ट्र किसान समिती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ यांचा सुहास कांदे यांनी दारुण पराभव केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ निधी वाटपाबाबत भेदभाव करीत असल्याचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी थेट न्यायालयात जाऊन तक्रार दाखल केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली.

         महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नांदेड विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास गांधी यांच्या माध्यमातून विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक झाल्यास आमदार सुहास कांदे यांना पसंती दिली जाते. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट बाहेर पडलं महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे.

................................................................................

आता कोण प्रथम दोस्तीचा हात पुढे करतो‌ पण कोण कसा प्रतिसाद देतो याकडे संपूर्ण नांदगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे

भुजबळ यांनी कांदे यांना जमून घ्यावे लागेल राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू वा मित्र नसतो. हे चार वर्षातील घटना घडामोडी वरून लक्षात येते

................................................................................

 (१) अजित पवार यांनी नवीन नेतृत्वाला संधी देण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल.

 (२) नांदगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार वचन भुजबळ यांच्यासोबत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण पाटील यांनी व्यक्त केला.

‌................................................................................

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद छगन भुजबळांकडे  देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यांना पालकमंत्रीपद शिंदे गटाच्या शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. याबाबत नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अडचणी मांडल्या आहेत. त्यावर नांदगाव विधानसभा मतदारसंघाला निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना अस्वस्थ केले आहे. नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री कोणीही असला तरी विकास कामासाठी निधी मिळाला पाहिजे अन्यथा आपला संघर्ष अटळ आहे.

            सुहास कांदे विद्यमान आमदार नांदगाव

......................‌.................................‌.........................

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️