नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायत अंतर्गत व्यापारी संकुल बांधून घेण्याची नागरिकांची मागणी


नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील चार हजार लोकसंख्या असुन  या गावात दर रविवारी आठवडे बाजार पूर्वीपासून भरत आहे. आजूबाजूच्या परिसरातील वीस ते पंचवीस गावातील नागरिक बाजार करण्यासाठी येथे येत असतात. आठवडे बाजारात विकृते आणि ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. विक्रेत्यांना मालाची विक्री करण्यासाठी रस्त्यावरील जमिनीवर बसावे लागते. त्यामुळे जळगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायत अंतर्गत व्यापारी संकुल बांधून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिनांक 13 जून 2023 रोजी गुरुवारी नांदगाव पंचायत समितीचे गट विकासासाठी अधिकारी गणेश चौधरी यांना नाशिक जिल्हा नशाबंदी मंचाचे नांदगाव तालुका अध्यक्ष विश्वास कारभारी बागुल यांनी व ग्रामस्थांनी दिले.

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील चार हजार लोकसंख्या असून अनेक वर्षापासून (पूर्वीपासून) दर रविवारी आठवडी बाजार भरत आहे. आजूबाजूच्या परिसरातील 20 ते 25 गावातील नागरिक जळगाव बुद्रुक येथे दर रविवारी बाजार करण्यासाठी येत असतात. आठवडे बाजार मध्ये विक्रेते आणि ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी व्यापारी संकुल आणि आठवडे बाजाराची काही व्यवस्था नसल्याने व्यापारी व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरस होते. विक्रेत्यांना मालाची विक्री व्यवहार करताना रस्त्यावरील जमिनीवर बसावे लागते. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. तसेच आठवडे बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी व्यापारी संकुल नसल्यामुळे ग्रामपंचायतीचेही उत्पन्नस्रोत थांबले आहेत. व्यापारी संकुलाची बांधकाम झाले असते तर ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळाले असते. गावातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांना गावातच स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता. ग्रामपंचायतीलाही आर्थिक कर मिळाला असता. 

  त्यामुळे ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती मजबूत झाली असती. तरी सर्व बाबींचा विचार करून जनहितासाठी व गावाच्या विकासासाठी तथा ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी व्यापारी संकलनाचे बांधकामास  मंजुरी मिळवुन द्यावी. त्यामुळे व्यापारी क्षेत्राला चालना मिळेल. गावातील तसेच परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीचा लाभ गावातच मिळेल. व्यापारी संकुलामुळे नागरिकांना व्यवसाय मिळेल. शहरात जाण्याचा खर्च आणि वेळ याची बचत होईल. तरी महोदयांनी तात्काळ व्यापारी संकुल मंजूर करून व्यापारी संकुलाचे बांधकाम शासनाकडून करून मिळावी अशी मागणी नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव बुद्रुक येथील नागरिकांनी व नाशिक जिल्हा नशाबंदी मंच द्वारे करण्यात आले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️