जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर

 

Jalgaon-District-Police-Patil-Recruitment-2023

(सुविधा ऑनलाईन रावेर) : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांतर्गत पोलीस पाटील पद(Police Patil Recruitment) भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून ३१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.[ads id="ads1"]

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात १८ जुलै पासून होत आहे.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील (Sub Divisional Officer) पोलीस पाटील (Police  Patil)रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. जळगाव - ४२, एरंडोल -‌६६, पाचोरा - ३६, चाळीसगाव - ४१, अमळनेर - ८०, फैजपूर - ४३ भुसावळ - ३६ असे रिक्त पदे आहेत.[ads id="ads2"]

Police Patil Recruitment 2023 भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अशंत बदल करणे पदांच्या एकूण व गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबधित उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी (Sub Divisional Officer) यांना राहतील व तसा निर्णय अंतिम असेल असे. आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे‌.

हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या

विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकृत‌ पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

पोलिस पाटील पदभरती -२०२३ ( सविस्तर जाहिरात पहा)

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️