विषारी सापाने दंश केल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू : यावल तालुक्यातील घटना


फिरोज तडवी (यावल प्रतिनिधी)

यावल तालुक्यातील हिंगोणा गावात खळयात झोपलेल्या बालकास विषारी सापाने दंश केल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरबार बिरलाल बारेला (वय-९) मयत मुलाचे नाव आहे.[ads id="ads1"] 

दरबार बारेला हा मुलगा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबा सोबत हिंगोणा गावाजवळील वसंत परदेशी यांच्याकडे कुटुंब शेतीकामास असल्याने खळयात  राहून आपला उदरनिर्वाह करीत  होते. दरम्यान दिनांक २० जुलै गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास खळयात गाड  झोपेत असतांना त्याला उजव्या हाताच्या पाठीमागे विषारी सापाने दंश केल्याने तो जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली.[ads id="ads2"] 

  या बाबत मयत बालकाच्या नातेवाईवाईकांनी फैजपुर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे दरबार बारेला या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी केले. घटनेचा पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघमांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ राजेश बन्हाटे हे करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️