अवैध सावकारीच्या तक्रारींवरून आज दिनांक 8 जून सकाळ पासून कुंभारखेड्यात (Kumbharkheda Taluka Raver) उपनिबंधकांच्या निर्देशावरून तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले, रावेर तालुक्यातील कुंभारखेडा(Kumbharkheda Taluka Raver) तसेच परिसरातील रहिवासी असणार्या नऊ शेतकर्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अवैध सावकारीबाबत तक्रारी केल्या होत्या.[ads id="ads2"]
आज सकाळीच सहकार खात्याच्या पथकांचा ताफा रावेर तालुक्यातील कुंभारखेडा(Kumbharkheda Taluka Raver) येथील अशोक जगन्नाथ पाटील, अतुल अशोक पाटील आणि नितीन राजेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांनी घराचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली. दुपारी साधारणपणे चार ते साडेचार त वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या छाप्यांमध्ये तिन्ही ठिकाणची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून कारवाईमध्ये जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले होते.
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
यातील पहिल्या पथकात रावेर येथील सहायक निबंधक विजयसिंह गवळी यांच्या नेतृत्वाखाली इब्राहिम तडवी, धिरज पाटील, फकीरा तडवी आणि श्रीमती अनुजा बाविस्कर यांचा समावेश होता. तर, दुसर्या पथकात जामनेरचे सहायक निबंधक जगदीश बारी यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र गाढे, श्रीमती अरूणा तावडे, वाहीद तडवी आणि योगेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.
कुंभारखेड्यासह चिनावल (Chinawal Taluka Raver) येथील एकूण नऊ शेतकर्यांच्या तक्रारी अर्जावरून ही कार्यवाही करण्यात आली आहे. काय काय कागदपत्र जप्त करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नसून या कागदपत्रांची छाननी करून तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.