शाहू महाराज हे भारतीय इतिहासातील एकमेव कृतिशील राजे : दीपध्वज कोसोदे

 


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  महात्मा फुले यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शाहू महाराज यांनी आपल्या राज्य कारभारात सर्व स्तरातील लोकांसाठी काम केले, त्यामुळे भारतीय इतिहासात  शाहू महाराज हे एकमेव कृतिशील राजे ठरले.असे प्रतिपादन दीपध्वज कोसोदे यांनी केले. 

काल रुईखेडा येथे शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेडकरी विचारवंत दीपध्वज कोसोदे यांच्या हस्ते सार्वजनीक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. 

या वेळी महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे.त्यामुळे आपल्या राज्याची ओळख पुरोगामी राज्य अशी होते,असा सूर  इतर वक्त्यांनी व्यक्त केला. सुनील अकोलकर, डॉ. विजय भिवसने, गणेश घुले यांनी या वेळी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुईखेडा ग्रा प च्या सरपंच सौ उषा अजय गुरचळ होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीरंग गुरचळ, सुरेश गुरचळ, शैलेश गुरचळ, राष्ट्रपाल मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️