भीम आर्मी चे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत साक्री चे तहसीलदार यांना दलित समाजाच्या वतीने निवेदन सादर



साक्री (अकिल शहा): भीम आर्मी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला. चंद्रशेखर आझाद प्रवास करत असलेल्या गाडीवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. देवबंद परिसरातून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा जीव थोडक्यात बचावला असला तरी गोळीचा छर्रा त्यांना लागला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या कंबरेच्या भागाला दुखापत झाली आहे. 

आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ साक्रीत तहसील कार्यालय परिसरात साक्री तालुक्यातील दलित समाज एकत्रित येऊन भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आली व तसेच साक्री चे तहसिलदार सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️