बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालय,केंद्रीय लोक संचार ब्यूरो,सॉन्ग एंड ड्रामा विभागान्तर्गत नागपुर येथे पार पडलेल्या 10 जिल्ह्यातील कला संचाच्या निवड चाचणी सदरिकरणात बुलडाणा जिल्ह्याच्या मातृभूमि कला संचाची निवड करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालय,केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा विभाग, पुणे कार्यालया मार्फ़त शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा प्रचार व प्रसार, विविध लोककला प्रकार द्वारे करण्यासाठी खाजगी नोंदनीकृत संचा कडून प्रस्ताव मागितले जातात व त्यानुसार त्यांचे निवड चाचणी प्रत्यक्ष सादरिकरण, मुलाखती द्वारे करण्यात येऊन नोंदणी केली जाते.[ads id="ads2"]
नागपुर येथे दूरदर्शन केंद्र येथे विदर्भ व मराठवाड़ा तील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, गडचिरोली,नागपुर, नांदेड, परभणी,हिंगोली अमरावती, या 10 जिल्ह्यातील प्रस्तावित कला संचाचे निवड चाचणी सादरिकरण आयोजित करण्यात आले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दे माली च्या मातृभूमि बहुउद्देशीय पानलोट ग्रामविकास संस्था च्या कला संचाचे प्रभावी सादरिकरण निवड चाचणीत पात्र ठरविन्यात आले.त्याबाबत चे नुकतेच निवड पत्र प्राप्त झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून एकमेव मातृभूमि कला संच पात्र यादीत समाविष्ट आहे.
मातृभूमि कला संच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सूचना व माहिती सेवा संचालनालय ,जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय बुलडाणा अंतर्गत सुद्धा पैनल वर असुन विविध शासकीय विभागाचे जनजागृती कार्यक्रम सादर करीत असुन कार्यरत आहे.
निवड झालेल्या या पात्र कला संचात युवा लोककलावन्त गजेंद्र गवई, गट प्रमुख किशोर मैंद, लोकशाहीर मल्हारी गवई,गायक विलास गवारगुरु, ढोलकी वादक राजू हिवराले, सहकलाकार रवि हिवराले,अजय हिवराले, गायिका कल्पना सिरसाठ, ज्योति मिसाल यांचा सहभाग आहे.
सदर निवड़ी मुळे मातृभूमि कला संचाच्या कलावन्ताचे सर्वत्र अभिनन्दन होत आहे.