रावेर प्रतिनिधी/ मुबारक तडवी
पुण्यासह नांदेड जिल्ह्यातील राहत्या घरी सीबीआयचे छापे : ५ कोटींचे घबाड हस्तगत
पुणे चे अतिरिक्त विभागीय आयुक्तांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी रंगेहाथ पकडले. त्यांचे कार्यालय, क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील 'ऋतुपर्ण' सोसायटी आणि नांदेड येथील खासगी निवासस्थानी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. [ads id="ads1"]
या कारवायांमध्ये सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे विभागीय आयुक्तालयातील दालनात साडेपाच तास सुरू असणाऱ्या छापासत्रात सीबीआयने चौकशीअंती सर्व कागदपत्रे हस्तगत केली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीसाठी त्यांना पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.[ads id="ads2"]
पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील भूसंपादनाच्या लवादाचे कामकाज त्यांच्याकडे होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील माळशिरस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या सुनावण्यांचे कामकाज सुरू असून, येथील शेतकऱ्यांकडून एक कोटी रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकी दहा लाख रुपये घेतले जात असल्याची तक्रार पुण्यातील अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी एक महिन्यापूर्वी सीबीआयकडे केली होती. त्यांनी अॅड. तडवी यांच्याकडेही दहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार सीबीआयने एक महिन्यापासून सापळा रचला होता. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अॅड. तडवी यांच्याकडून त्यांनी स्वतःच्या दालनात पैसे स्वीकारलेअसता सीबीआयचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने थेट छापा टाकून ही कारवाई केली.