यावलकरांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप

 


यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषदेतर्फे दैनंदिन कामकाजाच्या सुविधा तसेच साफसफाई  घंटागाडी,पाणीपुरवठा इत्यादी प्राथमिक सुविधा यावलकरांना वेळेवर मिळत नसल्याने तसेच कार्यालयीन वेळेत नगरपरिषद काही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात कार्यालयीन वेळेत हेलपाट्या माराव्या लागतआहे त्यामुळे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]

यावल शहरात व विकसित भागात ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी कधीही वेळेवर येत नसल्याने एक ते दोन दिवसाआड कचरा संकलन केला जात आहे घंटागाडी केव्हा येते आणि केव्हा निघून जाते हे सुद्धा नागरिकांना समजून येत नाही, झाडु मारणारे कर्मचारी ठराविक दर्शनी भागातच झाडू मारून साफसफाई करीत असल्याने तिरुपतीनगरसह इत्यादी अनेक परिसरात झाडू मारणारे कधीच फिरकत नाहीत,गटारी काढणाऱ्यां कामकाजात सुद्धा दयनीय अवस्था असल्याने तसेच शहरात ठिकठिकाणी डुकरांचा,मोकाट गुरांचा व कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे, पाणीपुरवठा वेळेवर होत नाही.इत्यादी असुविधांकड़े यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि प्रशासक यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads2"]

     यावल नगरपरिषद हद्दीत वाढते अतिक्रमण,अनधिकृत बेकायदा बांधकामे, सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर विविध व्यावसायिक यांच्यासह चिकन सेंटर,मटन विक्रेते यावल नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता नगरपरिषदेच्या नाकावर टिचून आपले बेकायदा व्यवसाय सर्रासपणे करीत आहेत,सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर अतिक्रमण बेकायदा व्यवसायिक यांच्यामुळे वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

तसेच यावल नगरपालिकेतर्फे विविध कामे जे होत आहेत ती कामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता निकृष्ट दर्जाची होत आहे,अनेक भागात स्ट्रीट लाईट सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत बंद होत नसल्याने येणाऱ्या विजेचा आभार यावलकरांना त्यांच्या विविध करातून भरावा लागत आहे कोणत्याही विभागाचे आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर ठेकेदारावर नियंत्रण नसल्याने तसेच  संबंधितांचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेता आणि कोणतेही कार्यवाही होत नसल्याने यावलकरांमध्ये यावल नगरपरिषद प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️